दख्खन मोमीन जमातच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरास भरघोस प्रतीसाद .
दख्खन मोमीन जमातच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरास भरघोस प्रतीसाद
दख्खन मोमीन जमात, पुणे यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक २६ मार्च २०१६ रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत करण्यात आले होते. या शिबीराचा मुख्य उद्देश “महिला आरोग्य जागृति” करण्याबाबत तसेच परिसरातील नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करणे हा होता.
या शिबिरात इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अँड रिसर्च सेंटरचे डॉ. अरबीना मुजावर, डॉ. विजय रामदासी व डॉ. साबिर मुजावर, तसेच यूनानी रुग्नालयाचे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात परिसरातील दोनशेहुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. या शिबिरामधे महिलांसाठी आरोग्य जागृति कार्यशालेचे आयोजन करण्यात आले होते, तसेच डोळे तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासनी, हाडांची घनता (बोन डेन्सिटी) तपासणी, रक्त तपासणी अशा विविध तपासण्या एकाच ठिकाणी आयोजित करण्यात आल्या. तसेच या शिबिरात एम. ए. रंगूनवाला महाविद्यालयाच्या फिजिओथेरपीस्टतर्फे नागरिकांना फिजिओथेरपीचे मार्गदर्शन करण्यात आले.
दख्खन मोमिन जमात पुणेचे अध्यक्ष हाजी रफिउद्दीन मोमीन, सल्लाह्गार समितीचे अध्यक्ष हाजी अब्दुल कादरभाई मुलाणी, दख्खन मोमीन जमात एजुकेशन कमिटीचे अध्यश इम्तीयाज शेख व उपाध्यक्ष बिलाल पेनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासदांनी व तरुणांनी या शिबिराचे आयोजन करण्यात मोलाची कामगिरी बजावली आणि हे मोफत आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पाडले.
Comments
Post a Comment